निरपराध आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्ह े दाखल करू नका- केंद्रियराज्यमंत्री रामदास आ ठवले

भीमा कोरेगाव येथे निरपराध आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्यामुळे आंबेडकरी जनता प्रचंड संतापली होती.स्वयंस्फूर्तपणे रस्त्यावर उतरून आंदोलनाद्वारे आपला संताप भीमसैनिकांनी व्यक्त केला. महाराष्ट्रभर सर्व रिपब्लिकन गट तट विसरून राज्यभरातील आंबेडकरी जनता एकजुटीने निषेध आंदोलनात उतरली. जय भीमच्या एकजूटीची बुलंद ताकद दिसली. अशी एकजूट कायम ठेवण्याचे ठेवण्याचे आवाहन केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच या आंदोलनात शांततापूर्ण निषेध नोंदविणाऱ्या निरपराध आंबेडकरी कार्यकर्त्यांवर दंगलीचे गुन्हे दाखल करू नका असे आवाहन ना रामदास अठवलेंनी केले आहे.

भीमा कोरेगाव हल्ल्याच्या
निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आले.राज्यभरातील पोलीस ठाणे ;तहसील काचेरीवर रिपाइं च्या वतीने शांतातपूर्ण निदर्शने आणि धरणे तसेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र बंद च्या आंदोलनात रिपब्लिकन पक्ष आघाडीवर होता अशी माहिती रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी दिली.

मुंबईसह राज्यभर रिपाइंच्या कार्यकर्त्यांनीशांततापूर्ण निदर्शने केल्याने आजचा महाराष्ट्र बंद प्रचंड यशस्वी झाला . मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आजच्या निषेध आंदोलनात सर्वत्र आघाडीवर होते. रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी मुंबईची नाकेबंदी केली होती. सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. महाराष्ट्राच्या रस्त्यास्त्यावर निळा झेंडा आणि एकच साहेब बाबासाहेब च्या घोषणांनी मुंबई दणाणून गेली होती.
धारावी येथे रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.
मुंबईत दहिसर चेकनाका येथे रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे अभयाताई सोनावने रमेश गायकवाड आदींच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मुलुंड चेकनाका येथे रिपाइंचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल गांगुर्डे ; राष्ट्रीय सचिव सौ शिलाताई गांगुर्डे ; जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड योगेश शिलवंत सौ अनिता अलंकार जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी दै सम्राट चे संपादक बबन कांबळे हेही निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.घाटकोपर पश्चिम एल बी एस रोड येथे रिपाइंचे संदेश मोरे ; सौ नैनाताई संजय वैराट; तुकाराम मोरे आदींच्या नेतृत्वात रास्तारोको आणि तीव्र निदर्शने करण्यात आली .त्यात हेमंत रणपिसे;गुलाब म्हात्रे ; चंद्रकांत निकम ; राजिया शरफू खान ; क्षमा परडकर ; शशिकला जाधवअमिना खान ; आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सांताक्रूझ येथे विवेक पवार यांच्या नेतृत्वात तसेच विक्रोळी पूर्व येथे सुरेश भालेराव यांच्या नेतृत्वात तसेच गोरेगाव मध्ये रमेश पाईकराव ; रमेश पाळंदे ;जे एम शेख ;उषाताई रामळू आदींच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.
भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करीत या हल्ल्यातील गुन्हेगारांवर अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाइंतर्फे आज संपूर्ण मुंबईतील पोलीस ठाण्यावर
देण्यात आले. आंदोलन शांततेने पार पडले तसेच चोख बंदोबस्त ठेऊन सुव्यवस्था ठेवल्याबद्दल पोलिस प्रशासनाचे रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी आभार मानले.